कोरोना साथीने सर्वत्र थैमान घातले असतांना औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी आता काळजी घेतांना दिसतात.
पैठण येथील मॅट्रिक्स फाइन सायन्सेस प्राईवेट लिमिटेड या कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नुकतीच कोविड चाचणी करून घेतली. सुदैवाने सर्वच्या सर्व कर्मचारी निगेटिव्ह आले आहेत.
पैठण येथील मॅट्रिक्स कंपनी च्या व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तपणे कोविड चाचणी करवून घेतली, सादर चाचणी मध्ये एकूण कर्मचाऱ्यांपैकी कुणीही कोरोना संक्रमित अथवा संशयित रुग्ण आढळले नाही.
मॅट्रिक्स कंपनी पैठण येथून आपला कारभार चालवते व उत्पादन जगातील असंख्य देशाना निर्यात करते आहे.
कंपनी व्यवस्थापनाच्या नियोजनानुसार कंपनीचे संचालक कुणाल सिकची, अध्यक्ष जितेश पटेल व सर्व कर्मचाऱ्यांनी वाल्मी नाका येथे आरोग्य विभागाने स्थापित केलेल्या केंद्रावर उपस्थित राहून चाचणी करवून घेतली.
कंपनी तर्फे मानव संसाधन विभागाच्या श्रीमती ज्योती सावदेकर व राजेश जंजाळकर यांनी शासकीय वैद्यकीय पथकास विशेष सहकार्य केले. औद्योगिक क्षेत्रातील सर्वच कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करून घ्यावी असे आवाहन मॅट्रिक्स संचालक मंडळाने केले आहे.














